इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण बाजारपेठ असणाऱ्या घोटी गावातील रेल्वेगेट दुरुस्तीच्या कामांसाठी ४ दिवस बंद राहणार आहे. वाहतूक आणि जण्यायेण्यास गेटवरून मनाई करण्यात आलेली आहे. उद्या दि. २४ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजेपासून ते २७ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद राहणार आहे. येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. याबाबत रेल्वेचे अधिकारी बैकुंठसिंग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. देवळे गावाकडून सिन्नर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने पर्यायी मार्ग असून ह्या मार्गाने येण्या जाण्यासाठी नागरीकांना पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे.