बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्था आयोजित उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

बँक ऑफ महाराष्ट्र प्रायोजित व महाबँक आर-सेटी प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत ओझर येथे 6 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. आज ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ह्या महत्वपूर्ण प्रशिक्षणामध्ये 35 महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र ओझर शाखेचे मुख्य प्रबंधक जितेंद्र राठोड, बँकेचे कृषी अधिकारी किसन सानप, वैशाली कदम, प्रद्युम्न पंडित, हाँटेल मँनेजमेट काँलेजचे प्राध्यापक, सुनंदा सोनवणे, आरसेटीचे प्रशिक्षक राजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते. सुवर्णा बूरकूले यानी सूत्रसंचालन केले. प्रास्तविक राजेंद्र पवार यांनी केले. सविता शिरापुरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!