
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत असलेल्या गोंदे दुमाला गाव सर्वदूर प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून गावात प्रवेश करतांना फलक नसल्याने गोंदे दुमालाची ओळख मिटत चालली होती. ही बाब ओळखून राजमुद्रा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप नाठे यांच्या पुढाकाराने गोंदे दुमाला या गावाच्या नावाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजूला दिशादर्शक फलक लावून पुन्हा गावाची ओळख निर्माण केली आहे. नेहमीच सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान असणारे राजमुद्रा मित्र मंडळाचे कौतुक होत आहे. लोकांसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या कामासाठी दिशादर्शक फलक लावल्याबद्धल मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप नाठे, बंडू नाठे, रामेश्वर चाटे, समाधान वारुंगसे, अजय गुप्ता, मच्छिंद्र काळे, ऋषिकेश नाठे, हेमंत राऊत, निलेश नाठे आदी कार्यकर्त्यांचे गोंदे दुमाला ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले जात आहे.