कसारा घाटात चालत्या ट्रकने घेतला अचानक पेट : टोल आणि महिंद्रा पथकाकडून आग विझवण्यात यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटात हॉटेल शिवनेरी जवळ चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. आज पहाटे साडेसहा वाजता ही घटना घडली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर टोलच्या अग्निशमन दल व महिंद्रा अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले. ह्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
ह्या घटनेमुळे मुंबई नाशिक लेनची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना लोखंडाने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

error: Content is protected !!