इगतपुरीनामा न्यूज – लोकशाहीचा उत्सव म्हणून सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे महत्व देण्यात आले आहे. त्यानुसार मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन आणि जागरूक नागरिक प्रयत्न करीत आहेत. मात्र इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील २ पैकी एका मतदान केंद्रावर ढिसाळ कारभाराचा फटका मतदारांना आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना बसतो आहे. येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या एकतर्फी कारभारामुळे अनेक महिला आणि पुरुष मतदारांना भर कडक उन्हात रांग लावावी लागली असून अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. वृद्ध मतदारांनी यंत्रणेला शिव्यांची लाखोली वाहत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना केंद्रापासून लांब भर उन्हात हुसकावून दिले गेल्याने ते हतबल झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या साहाय्याने मतदारांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी रात्री टाकण्यात येणाऱ्या मंडपवाल्याला हुसकावून देण्यात आले असल्याचे समजते. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना अनेकांनी आपली कैफियत मांडली आहे. योग्य तो कार्यवाही तातडीने करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी गोंदे येथील मतदान केंद्र क्रमांक १४२ सपशेल अपयशी ठरणार आहे. मतदाराला किमान दीड तास रांगेत उभे राहावे लागणार असल्याने मतदार मतदानाकडे पाठ फिरवत आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group