इगतपुरीनामा न्यूज, दि. 22
पुणे येथील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अर्थात एआरडीईचे शास्त्रज्ञ एल. के. गिते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी पदवी मिळाली आहे. आंतरशाखीय संगणन विज्ञान विभागातून पीएचडीसाठी "पॅरामीटर एस्स्टीमेशन मेथडस् फॉर एक्सटर्नल बैलीस्टीक्स" या शीर्षकांतर्गत संशोधन करून विद्यापीठाला त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. ह्या संशोधनाला मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेंद्र देवधर यांनी मार्गदर्शन केले. एल. के. गिते हे मूळचे संगमनेर तालुक्यातील सोनोशी गावचे असून ते पुण्यातील संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास संस्थेच्या विभागात कार्यरत आहेत. त्यांचे या विषयावरील शोधनिबंध आंतररा्ट्रीय नियकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. या संशोधनामुळे रॉकेट, मिसाईल आणि बॉम्ब यावर हवेचा वेगवेगळ्या गतीत होणारा परिणाम मोजता येणार आहे. त्यांच्या यशाबद्धल त्यांचे महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.