विकासासाठी तन मन धन ; आता लढणार साकुर गण : राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष गोकुळ जाधव करणार उमेदवारी 

इगतपुरीनामा न्यूज – राजकारणात उच्चशिक्षित तरुण आणि होतकरू युवा नेतृत्व आले पाहिजेत. तरुणांचे योगदान गावागावांच्या विकासाला नवी दिशा मिळवून देऊ शकते. सातत्याने एकाच ठिकाणी सत्ताकेंद्र असल्यामुळे विकासाचा राजमार्ग कुंठीत झालेला आहे. ह्या पार्श्वभूमीवर आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत साकुर गणातून उमेदवारी करणार असल्याचे शेणीतचे कृषी पदवीधर आदर्श युवा शेतकरी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा कार्याध्यक्ष गोकुळ जाधव यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून साकुर गणात सक्षम नेतृत्व नसल्याने विविध प्रकारच्या समस्या पाचवीलाच पूजलेल्या दिसतात. ह्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कोणीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले असल्याचे स्पष्ट होत नाही. म्हणूनच कृषी पदवीधर असलेले युवा शेतकरी गोकुळ जाधव यांनी साकुर गणाचे खंबीर नेतृत्व करावे अशी युवकांची तळमळ आहे. त्यामुळेच आगामी पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी उमेदवारी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. 

अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू संपून गेले आहेत. या कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गोकुळ जाधव निरंतर अग्रेसर असतात. यासह सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न युवा शेतकरी गोकुळ जाधव नेहमीच सोडवत असतात. युवा शेतकरी गोकुळ जाधव यांना शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कारही मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी शेतात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी त्यांचा मोठा पुढाकार असून राज्याबाहेर अभ्यास दौरे केले आहेत. त्यांचे वडील प्रकाश जाधव हे सेंद्रिय पीक उत्पादन करणारे हाडाचे शेतकरी आहेत.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ जाधव हे स्वतःच्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करतात. त्याबरोबरच इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करीत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांनी प्रेरित झालेला श्री. जाधव यांचा परिवार आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांची चांगली कामगिरी असून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. युवक वर्ग, शेतकऱ्यांशी कायमच जिव्हाळ्याचा संबध ठेवून त्यांच्याकडून समन्वय साधला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोकुळ पिंगळे आणि इगतपुरी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या  मार्गदर्शनाखाली पक्षाने त्यांचा विचार करावा अशी लोकांची भावना आहे. साकुर गणातील जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!