इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना. बच्चू कडू यांना साकडे : इगतपुरीच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ना. कडू यांच्या सोबत बैठक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या असून त्यांना समस्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने लक्ष घालणे आवश्यक आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ना. बच्चू कडू यांनी लक्ष घालावे यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत ना. बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी तालुक्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. याप्रकरणी अधिक माहिती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलू असा शब्द ना. बच्चू कडू यांनी दिला.

इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणे आणि मुबलक पाऊस असूनही येथील नागरिकांना कायमच पाण्याची समस्या आहे. राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी, लष्कर, रेल्वे आदी प्रकल्पांमुळे इगतपुरी तालुक्यात नागरिक विविध प्रश्नांनी ग्रासलेले आहेत. युवक बेरोजगार आहेत. विकासासाठी योगदान देणारे शेतकरी भूमिहीन आणि अल्प भूधारक झालेले आहेत. मुंबईसह मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारा इगतपुरी तालुका सर्व सुविधांपासून वंचित आहे आदी विषयांवर प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपाध्यक्ष सोपान परदेशी, अशोक ताथेड, पत्रकार मंगेश शिंदे, वैतरणाचे माजी सरपंच बाळु शिंदे यांनी ना. बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले.

मुख्य पीक भातासह सर्व पिकांना दरवर्षी अतिवृष्टी, वादळ,चक्रीवादळ आदींचा नेहमीच फटका बसत बसतो. यामुळे शेतकरी, कष्टकरी हवालदिल झालेले आहेत. अशा भयाण काळात इगतपुरी तालुक्यातील प्रहार दिव्यांग संघटना शेतकरी, अनाथ, विधवा, दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करते. संघटनेच्या माध्यमातून सरकार दरबारी जनतेचा आवाज पोचवण्यासाठी सदैव तत्पर असणारी व अन्यायाला वाचा फोडणारी शेवटच्या माणसांपर्यंत मदत मिळून देणारी जागृत संघटना म्हणून काम करत असते. याबाबत ना. बच्चू कडू यांनी सर्वांचे कौतुक केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!