महाराष्ट्र बंदमुळे सोमवारी ११ ऑक्टोबरला घोटी बाजार समिती राहणार बंद : शेतकऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन शेतमाल विक्रीला आणू नये

मुख्य प्रशासक ॲड. संदीप गुळवे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ सोमवारी ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. यामध्ये घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांनी ह्या दिवशी मोठ्या संख्येने बंदमध्ये सहभागी व्हावे. आपला शेतीमाल घोटी बाजार समितीमध्ये आणूं नये. शेतकऱ्यांनी आपली ताकद यानिमित्ताने दाखवून शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध करावा असे आवाहन घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक ॲड. संदीप गुळवे यांनी केले आहे.

लखीमपूर येथील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून ठार मारले. काँग्रेस नेत्यांना बेकायदा अटक करून डांबून ठेवण्यात आले. ही मोठी घटना असून शेतकऱ्यांना संपवण्याचे मोठे कारस्थान आहे. यानुसार महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामध्ये राज्यातील सर्व शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीत आणू नये. शेतकरी रक्षणासाठी बंदमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन घोटी बाजार समितीचे मुख्य प्रशासक ॲड. संदीप गुळवे यांनी केले आहे.

शेतकरी विरोधी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे बळी घेतले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना बळ देणे आवश्यक आहे. म्हणून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा. घोटी बाजार समितीमध्ये ११ ऑक्टोबरला शेतमाल आणू नये. घोटी बाजार समिती महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी आहे.ॲड. संदीप गुळवे, मुख्य प्रशासक घोटी बाजार समिती

शेतकरी विरोधी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे बळी घेतले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना बळ देणे आवश्यक आहे. म्हणून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा. घोटी बाजार समितीमध्ये ११ ऑक्टोबरला शेतमाल आणू नये. घोटी बाजार समिती महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी आहे.

- ॲड. संदीप गुळवे, मुख्य प्रशासक घोटी बाजार समिती

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!