ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
लखीमपूर येथेशेतकर्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या सोमवारी शांततेच्या मार्गाने त्र्यंबकेश्वर तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे शेतकर्यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होते. परंतु तेथे भाजपाचे सरकार असुन केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्याने शेतकर्यांना चिरडले. अगोदर पासुन भाजपाची भुमिका ही सामान्य जनतेच्या विरोधात असुन हुकुमशाही मार्गाने अन्यांय अत्याचार भाजपाने चालवलेला आहे. शेतकर्यांना चिरडणार्या आरोंपींना शासन करण्याऐवजी पाठीशी घालण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. शेतकर्यावर गाडी घालुन आंदोलन चिरडणार्या भाजपाच्या नेत्यांना अटक करावी व गरीब शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने व शेतकर्यांनी उद्या सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर व तालुका बंदचे आवाहन केले आहे.
सामान्य शेतकर्यांना न्याय मिळावा व भाजपाच्या निषेधार्थ या बंद मध्ये व्यापारी, शेतकरी, कामगार या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर, तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, दिनेश पाटील, दिनकर मोरे, गणेश कोठुळे, बाळासाहेब कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविद्र वारुंगसे, मनोहर मेढे, संपत चव्हाण,भुषन अडसरे, मनोहर महाले, समाधान बोडके, सचिन दिक्षित, कल्पेश कदम, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव ,बहिरू मुळाणे, युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे, बाळु बोडके, कारभारी कोठुळे, अरूण मेढे, विजय गांगुर्डे, भिकुशेठ बत्तासे, रविंद्र भोये, पुंडलीक साबळे, हरीभाऊ बोडके यांनी केले. उद्या सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर येथे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जमावे असे कळवण्यात आले आहे.