
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा सकाळी अपघात झाला. नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जातांना ही घटना झाली. पोलिसांच्या वाहनाने तीन पलट्या मारल्या. तीन वाहनांचा हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी म्हणाले. एक वाहन पसार झाले आहे. ह्या घटनेत नाशिक शहर दलाचे ३ पोलीस जखमी झाले आहेत. संतोष भगवान सौंदाणे वय ५७, सचिन परमेश्वर सुक्ले वय ४३, रविंद्र नारायन चौधरी वय ३७ अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल होऊन जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मंगळवारी रात्री इगतपुरी जवळ झालेल्या अपघातात ३ युवक ठार झाल्याची घटना झालेली आहे. इगतपुरी ते नाशिक दरम्यान रोज लहान मोठे अपघात सुरु आहेत. ह्या अपघातांची कारणे शोधून त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.