इगतपुरीनामा न्यूज दि. १९ – गोंदे दुमाला आणि परिसरातील गावांमध्ये विविध प्रकारचे शिक्षण घेतली बेरोजगार युवक आहेत. ह्या बेरोजगार युवकांची यादी तयार करून त्यांना त्यांच्या योग्य त्या शिक्षणाप्रमाणे गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात रोजगार निर्मिती करून द्यावी. एवढी मोठी औद्योगिक वसाहत गोंदे दुमाला येथे असूनही गोंदे दुमालातील युवक आजही बेरोजगार आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वराज्य संघटनेचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि सर्वच पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. निश्चितच हा विषय मार्गी लागून युवकांना रोजगार मिळेल असा विश्वास शाखाप्रमुख गणेश नाठे, जयेश नाठे यांनी व्यक्त केला.
याबाबतचे निवेदन सरपंच शरद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी विजय जाधव यांना देण्यात आले. येणाऱ्या ग्रामसभेत ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा करून ठराव मंजूर केला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे निमंत्रक डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे, माजी उपसरपंच कमलाकर नाठे, माजी चेअरमन विजय नाठे, शरद नाठे, निलेश नाठे, रतन नाठे, दत्तू नाठे, योगेश बोराडे, मयूर जाधव, निखिल सातपुते, राजू ठाणगे आदी ग्रामस्थ आणि पदाधिकारी हजर होते. स्थानिक युवकांच्या रोजगार संबंधित विषयावर स्वराज्य संघटनेने लक्ष घातल्याने आगामी काळात हा विषय मार्गी लागणार आहे असे स्वराज्य संघटनेचे निमंत्रक डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी सांगितले.