इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबईच्या वतीने ‘राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला, पिंपळगाव डुकरा ता. इगतपुरी येथील भूमिपुत्र प्रा. राम जाधव यांना ‘राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संयोजन समितीने ह्या मानाच्या पुरस्कारासाठी प्रा. राम जाधव यांची निवड केली आहे.
प्रा. राम जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील उच्च गुणवत्ताधारक युवकांच्या रोजगारासाठी राज्यव्यापी लढा उभा करण्याचे काम केले. खासकरून डी. एड, बी. एड, सेट, नेट पात्रताधारक उमेदवारांसाठी राज्यभर आंदोलन, उपोषण आदी माध्यमातून संघर्ष उभा करून त्यांना न्याय देण्याचे काम केले. दहा वर्षांपासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती सुरू करण्यासाठी योगदान दिले. त्यामुळे हजारो युवक राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक म्हणू रुजू आहेत, प्राध्यापक भर्तीसाठीचा लढा आजही चालू आहे. त्यात ही यशप्राप्ती नक्की मिळेल असा आशावाद प्रा. जाधव यांनी व्यक्त केला.
त्यांच्याबाबत सन्मानाचा गावाला आदर वाटल्याने गावाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मालन भगवान वाकचौरे होत्या. भगवान नामदेव वाकचौरे, कचरू पाटील डुकरे, नारायण महादू भगत, नामदेव नाना वाकचौरे, परसराम गोविंद वाकचौरे, समाधान रामभाऊ वाकचौरे, हिरामण महादू चिकणे, जयराम सखाराम झनकर, रामभाऊ मुरलीधर भगत, गणपत म्हसुजी भगत, शंकर वाळू वाकचौरे, उत्तम दत्तू झनकर, दत्तू मुरलीधर सहाणे, शंकर महादू झनकर, त्र्यंबक नामदेव डुकरे, जिजाबाई नाना कुंदे, विजया संदीप जाधव, पूजा राम जाधव, संगिता संजय भगत, जिजाबाई गणपत भगत, सिंधूबाई बहिरू डुकरे, लक्ष्मण यशवंत डुकरे, किसन बबन वाकचौरे, रघुनाथ बहिरू वाकचौरे, भाऊसाहेब रामचंद्र डुकरे, अविनाश सहाणे, अमोल झनकर, योगेश सकभोर, बाळू बांडे, संतोष झनकर, शांताराम झनकर, वाल्मिक गायकवाड, केंद्रप्रमुख चंद्रकांत गांगुर्डे, ग्रामसेविका हर्षिता पिळोदेकर, कृषीसेवक मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी मारुती मामा भगत यावेळी उपस्थित होते.