इगतपुरी तालुक्यात १ ते ७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती : इगतपुरी शहरात वन्यप्राणी आढळल्यास खबरदारीसाठी झाले प्रबोधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी ( प्रादेशिक ) कार्यालय यांचे मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त इगतपुरी गावातुन वन्य जीवाबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. शासकिय वाहनातुन ध्वनीक्षेपक ( लाऊडस्पीकर )द्वारे वन्यजीव जनजागृती व स्टाफ मार्च करण्यात आला. ह्या जनजागृती मोहिमेत नागरीकांना वन्यप्राण्यांचा शहरात तसेच
शहाराच्या लगत वाढत असलेला वावर याबाबत आवाहन करण्यात आले. आपल्या आजुबाजुच्या परिसरात वन्यप्राणी आढळुन आल्यास खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.

वनपरिक्षेत्र कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, वनकर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातुन इगतपुरी गावठा, वरची पेठ पासुन मिलिंद नगर, शिवाजी नगर, वीस बंगला, सहा
बंगला, तीन लकडी पुलाजवळ तसेच, इगतपुरी बाजारपेठेतुन खालची पेठ जुने तहसिल कार्यालय शेजारी वनक्षेत्र कार्यालय इगतपुरी येथे व पुढे गिरणारे, बारा बंगला, गोळीबार वाडी व
पारदेवी रस्ता याठिकाणी बिबट-मानव संघर्षाबाबत जनजागृती करण्यात आली. त्रिंगलवाडी येथे ग्रामसभे निमित्त उपस्थित राहुन त्रिंगलवाडी पर्यटन व वन्यजीव सप्ताहाबाबत जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपाल भाऊसाहेब राव, दत्तु ढोन्नर, पोपट डांगे, शैलेंद्र झुटे व क्षेत्रीय वनकर्मचारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!