‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा : मंडळाधिकारी नानासाहेब बनसोडे यांच्या हस्ते कऱ्होळे येथे सातबारा वाटप

समाधान कडवे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २

महसूल विभागाने सुरू केलेला मोफत सातबारा वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे. सातबारा हा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यासाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना अद्ययावत केलेले सातबारे डिजिटल स्वाक्षरीने दिले जात असून या उपक्रमाचा जास्तीजास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन धारगावचे मंडळ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्होळे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

धारगाव महसूल मंडळात महात्मा गांधी जयंतीनिमित्त महसूल व वन विभागाच्या वतीने ‘शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उतारा वाटपाचा शुभारंभ मंडळ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केला. शासनाच्या आदेशानुसार, २ ते ९ ऑक्टोबर पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून एका तलाठ्यांकडे एक पेक्षा जास्त महसुली गावे असल्याने २ ऑक्टोबर रोजी महसुली सजा मुख्यालयाच्या ठिकाणी व त्यानंतर इतर गावांमध्ये ९ ऑक्टोबर पर्यंत मोफत सातबारा वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती नानासाहेब बनसोडे यांनी दिली. यावेळी तलाठी बी. बी. वायकंडे, तलाठी एस. वाय. कल्याणकर, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!