सलून असोसिएशनच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी संतोष सोनवणे : नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज – नाभिक समाजाचे भवितव्य धोक्यात येत असून अनेक शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. राजकिय पुढारी समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे यांनी केले. महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी युवा नेतृत्व संतोष सोनवणे यांना भगवान बिडवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. आपल्यांना इतरांच्या बरोबर नाही तर पुढे जायचे आहे. वक्ते तयार करा, युवा नेतृत्व तयार करा, समाजाला तुमची गरज आहे. पदाच्या माध्यमातून एकत्र आणणे प्रामाणिक काम करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे असेही बिडवे यांनी सांगितले.

नाभिक समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी युवा संघटन उभे करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष संतोष सोनवणे यांनी सांगितले. याप्रसंगी संतधाम अध्यक्ष अतुल चव्हाण, सलून असोसिएशन जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, कायदेशीर सल्लागार ॲड. सुनिल कोरडे, जिल्हा संघटक अशोकराव सूर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, उपतालुकाध्यक्ष विनायक रायकर, घोटी शहराध्यक्ष किरण कडवे, प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण सोनवणे, संकेत कोरडे, अनिल कोरडे, गणेश रायकर, इगतपुरी शहर उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, ॲड. सचिन खांबेकर, सचिन शेलार, महेश सोनवणे, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, शशिकांत व्यवहारे आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!