इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला भागातील वंचित श्रमजीवी आणि कष्टकरी असणाऱ्या आदिवासी कातकरी कुटुंबांना आता “आधार” मिळणार आहे. जन्माचा आणि रहिवासाचा कोणताही पुरावा नसल्याने अनेक वर्षांपासून हे कातकरी शासकीय योजनांपासून वंचित आणि दुर्लक्षित होते. याबाबत माहिती समजताच गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे यांनी पुढाकार घेतला. अस्वली स्टेशन येथील योगेश कर्पे यांच्या आधार केंद्रातून संबंधित कातकरी कुटुंबांना आधार कार्ड देण्यासाठी शरद सोनवणे यांनी प्रक्रिया पार पाडली. लवकरच ह्या सर्वांना आता “आधार” मिळणार आहे.
गोंदे दुमाला भागातील काळू तुकाराम हिलम, लालू तुकाराम हिलम, सुवर्णा लालू हिलम,चांगुणा हनुमंता झिंझुर्डे, सुमित्रा तुकाराम हिलम, ताराबाई तुकाराम हिलम या कातकरी व्यक्तींकडे आधार काढण्यासाठी आवश्यक पुरावे नव्हते. परिणामी अनेक वर्षांपासून त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळू शकला नाही. गोंदे दुमालाचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे यांनी त्यांच्या आधार कार्डसाठी पुढाकार घेतला. अस्वली स्टेशन येथील आधार केंद्राचे संचालक योगेश कर्पे यांच्या सहकार्याने ह्या कातकरी व्यक्तींना आधार मिळण्यासाठी आज सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. लवकरच ह्या सर्व कातकरी व्यक्तींना शरद सोनवणे यांचा माध्यमातून “आधार” मिळणार आहे. यावेळी इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव सहाणे, बेलगाव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष गुळवे, आधार केंद्राचे संचालक योगेश कर्पे आदी उपस्थित होते.