इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
उद्योग व्यवसायामध्ये अल्पावधीत मराठी तरुणाने घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात भर पडली आहे. यासह सामान्य नागरिकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी ओम चहा आणि स्नॅक्स सेंटर उपयुक्त ठरेल असा विश्वास विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गोंदे दुमाला येथील मोहन जाधव यांनी महामार्गावर व्हिटीसी फाटा येथे त्यांच्या ओम चहा आणि स्नॅक्स सेंटरचा आज शुभारंभ झाला. यावेळी कौतुक करतांना पदाधिकाऱ्यांनी मोहन जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. व्हिटीसी फाटा भागात अशा स्वरूपाच्या व्यवसायाची अत्यंत आवश्यकता होती. आपल्या दुसऱ्या शाखेचा प्रारंभ करून मोहन जाधव यांनी भरारी घेतल्याचे मान्यवर म्हणाले.
ओम चहा आणि स्नॅक्स सेंटरच्या शुभारंभप्रसंगी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे, वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप मालुंजकर, गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव, जेष्ठ नेते कारभारी नाठे, प्रकाश नाठे, ग्रामपंचायत सदस्य शिवरामबाबा बेंडकुळे, माजी सरपंच जयराम धांडे, उत्तमराव भोसले, लक्ष्मण धूमक, ओम टी स्टॉल व नाष्टा चालक-मालक सोमनाथ बुकाणे, मोहन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.