मुंबई आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्या अखेर मरण पावला. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. विशेष करून नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर या परिसरात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. यातील काही बिबट्याना जेरबंद करण्यात आले आहे तर अजूनही काही बिबट्याचा या पद्धतीप्रमाणे वावर हा सुरू आहे यांच्या मुक्त संचार यामुळे नागरिकांमध्ये अजूनही बिबट्याची दहशत आहे. इगतपुरीच्या वन विभागाने दरेवाडी येथील बिबट्या आज पिंजराबंद केला आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री सर्वसाधारण साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिक शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी गावाच्या अलीकडे असलेल्या आणि नाशिक शहराच्या पुढे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच तातडीने नाशिक वन विभागाचे पथक पोहोचले आणि बिबट्याला रेस्क्यू केले. तातडीने रोपवाटिकेत दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. मात्र तोंडाला जबर मार लागल्याने उपचार सुरु करण्याआधीच बिबट्या मृत झाला. अंदाजे ६ वर्षे वयाचा नर हा बिबट्या मृत्यू पावल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पोस्टमार्टम करून घेण्यात आले असून पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!