राष्ट्रभाषा हिंदी म्हणजे हृदयाची लोकप्रिय भाषा : अजित लुणावत ; केपीजी महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

राष्ट्रभाषा हिंदी हृदयाची भाषा असून भारताबरोबरच जगामध्ये बोलली जाणारी लोकप्रिय भाषा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देऊन या भाषेचा गौरव करण्यात आला असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अजित लुणावत यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रभाषा हिंदी दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, हिंदी विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. दामले उपस्थित होत्या.

श्री. लुणावत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, हिंदी भाषेत लालित्य असून अनेक लेखकांनी या भाषेत सकस साहित्य लिहिलेले आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी हिंदी साहित्य आणि भाषा हे आपल्या देशाचे वैभव असून सामान्य व्यवहाराची भाषा म्हणून आज अनेक जण याभाषेचा वापर करत आहेत. ही या भाषेच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे असे सांगितले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. व्ही. डी. दामले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. एस. दुगजे यांनी केले. आभार प्रा. के. पी. बिरारी यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा .एच .आर. वसावे, प्रा. बी. एस. महाले, प्रा. जी. एस. लायरे, प्रा. ए. एस. पाटील, प्रा. एस. ए. जगताप, प्रा. जी. एस. सैंदाणे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!