नाशिककरांनो…वालदेवी धरणावर गणेश विसर्जनाला येऊ नका ..! ; पिंपळद ग्रामस्थांचा विरोध आणि कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

नाशिक शहरापासून अगदी जवळ असणाऱ्या वालदेवी धरणावर दरवर्षी होणाऱ्या गणेश विसर्जनाला पिंपळद येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन करण्यासाठी नाशिक शहरातुन येणाऱ्या संभाव्य ३५ ते ४० हजार नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. ह्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील गणेशभक्तांनी वालदेवी धरणावर विसर्जनाला येऊ नये. शक्यतो घरच्या घरी विसर्जन करावे. तसे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यात यावे असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

रविवारी १९ सप्टेंबरला गणेश विसर्जन होणार आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीतील वालदेवी धरण नाशिक शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे ह्या धरणावर गणपती विसर्जनाच्या दिवशी नाशिक शहरातून लहान-मोठे, घरगुती तथा सार्वजनिक ३५ ते ४० हजार गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी ह्या धरणावर येतात. परंतु सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. पिंपळद ता. जि. नाशिक ह्या गावाच्या हद्दीत वालदेवी धरण येत असून येथील ग्रामस्थांनी कोराना साथीच्या पार्श्वभुमीवर वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्यासाठी तीव्र विरोध केलेला आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक शहरातील गणेश भक्तांनी वालदेवी धरणावर विसर्जनासाठी येऊ नये. गणेश विसर्जन शक्यतो घरीच्या घरी करावे, घरी विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी करण्याबाबत राज्य शासनाने आदेश आणि सुचनांचे पालन करावे. जेणे करुन वालदेवी धरणांवर गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांची कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळता येईल. कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहरातुन ह्या धरणावर विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी येऊ नये. गणेश विसर्जन शक्यतो घरीच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी करण्यात यावे असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!