इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण घोटी शहरात युवकांना व्यायामाचे साहित्य नसल्याने अन्य प्रकारे वेळ मारून न्यावी लागत होती. महामारी काळापासून शरीर सदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची जागृती सुद्धा वाढलेली आहे. यामुळे घोटी शहरातील युवकांची अत्याधुनिक व्यायामशाळा साहित्याची अडचण ओळखून समता परिषदेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवा काळे आणि ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे यांनी ५ लाखांचे अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य मंजूर करून दिले आहे. यामुळे घोटी येथील युवकांनी आनंद व्यक्त केला आहे. नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करून शिवा काळे, श्रीकांत काळे यांनी ५ लाखांचे साहित्य मिळवले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व साहित्य उपलब्ध होणार असल्याने शहरातील युवकांनी आभार मानले आहेत.
इगतपुरी तालुक्यात घोटी हे शहर मोठे शहर आहे. बदलत्या काळात लोकसंख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. व्यायामशाळा आणि संबंधित साहित्य सुद्धा कमी पडत आहे. यासह आरोग्याची जागृती, व्यायामाची आवश्यकता ओळखून महामारी काळामुळे नागरिक सजग झाले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर उपलब्ध साहित्यामध्ये व्यायाम करण्यासाठी अडचणी येत असल्याची बाब समता परिषदेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवा काळे, ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार दोघांनी नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे अत्याधुनिक व्यायामशाळा साहित्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. ना. भुजबळ यांच्या माध्यमातून घोटी शहरासाठी तब्बल ५ लाखांचे व्यायामशाळा साहित्य मंजूर करण्यात आले आहे. याबाबत वृत्त समजताच घोटी शहरातील युवकांनी शिवा काळे, श्रीकांत काळे यांचे आभार मानले आहेत.
युवा पिढी सदृढ आणि सक्षम झाली तरच आरोग्य निरामय राहील. युवकांना अत्याधुनिक व्यायामशाळा साहित्याची आवश्यकता असल्याचे समजताच आम्ही ना. छगन भुजबळ यांच्याकडे मागणी मांडली. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन घोटी शहरासाठी ५ लाखांचे व्यायामशाळा साहित्य मंजूर केले आहे. घोटीकरांच्या वतीने आम्ही भुजबळ साहेबांचे आभार मानतो.
- शिवा काळे, तालुकाध्यक्ष समता परिषद