इगतपुरीनामा न्युज, दि. ५
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. आजची आकडेवारीही दिलासादायक असल्याने कोरोनामुक्तीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज अवघ्या १ नव्या रुग्णाची भर पडली असून ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात सध्या फक्त २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हीच परिस्थिती आणखी आठवडा भर कायम राहिल्यास नक्कीच तालुका कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. असे असले तरी नुकतीच सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया प्रत्यक्षात राबवताना नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी इगतपुरीनामाशी बोलतांना सांगितले.
दरम्यान सगळीकडेच अनलॉक झाल्याने कालच्या रविवारी मुंबई नाशिकहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी होती. ही संख्या वेळीच आटोक्यात आली नाही आणि पर्यटकांची ये जा अशीच सुरू राहिली तर पुन्हा रुग्ण संख्या वाढण्याची भिती आहे. त्यामुळे तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक तपासणी होणे गरजेचे आहे.
कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.