
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
गोंदे औद्योगिक वसाहतीतील बिको कंपनी व्यवस्थापनाने कामावरून कमी केलेल्या कामगाराला न्याय मिळत नाही. म्हणून मंगळवार दि. १५ रोजी कुटुंबासह कंपनीच्या गेटवर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कामगार प्रकाश नाठे यांनी दिला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापन, नाशिकचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींसह संबंधीत यंत्रणेला निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गोंदे औद्योगिक वसाहतीमधील बिको कंपनीत २० वर्षे काम करणाऱ्या गोंदे येथील प्रकाश नाठे या कामगारावर चुकीचे आरोप करून कामावरुन कमी केले. त्यामुळे कंपनीच्या गेटवर मागील वर्षी ते आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसले होते. त्यावेळी कामगार आयुक्तांचे प्रतिनिधी व इगतपुरीच्या तहसिलदारांसमोर कंपनी व्यवस्थापनाने आठ दिवसात कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी होऊनही कंपनी व्यवस्थापन व कामगार आयुक्त यांच्याकडून अद्यापही न्याय मिळाला नसुन याविरोधात मंगळवार दि. १५ रोजी कुटुंबासह कंपनीच्या गेटवर आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रकाश नाठे यांनी दिला आहे.