अ.भा. म. साहित्य परिषद नाशिकच्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे : १७ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातील धामोरे येथे १ दिवसीय साहित्य संमेलन

नवनाथ गायकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिकच्या वतीने दरवर्षी मराठी भाषिकांचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यंदाचे हे दशकपुर्ती वर्ष असुन या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक तथा सकाळचे माजी संपादक पत्रकार उत्तम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष आनंद अहिरे व संमेलनाचे आयोजक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

यंदाचे १० वे साहित्य संमेलन अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धामोरे या गावी होणार आहे. कोरोना महामारीच्या पाश्वर्भुमीवर यंदाचे साहित्य संमेलन शासकीय नियम पाळुन फारशी गर्दी न करता निमंत्रित उपस्थितीच्यां समवेत संपन्न होणार आहे. हे संमेलन अवघ्या दोन सत्रात संपन्न होणार असुन पहिले सत्र उद्घाटन सत्र तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील नामांकित कवींचे कविसंमेलन रंगणार आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील शब्दगंध साहित्य परिषदेचे पदाधिकारी तथा सुप्रसिद्ध कवी सुनील गोसावी हे असणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजित “१० व्या राज्यस्तरीय मराठी भाषिक ग्रामीण व नवोदिताचें साहित्य संमेलन” अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले सुप्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे हे संपुर्ण महाराष्ट्राला परिचित असे व्यक्तिमत्त्व आहे. ठाणे येथे आयोजित ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, विविध साहित्यिक पुरस्काराने ते सन्मानित झालेले असुन, साहित्यासाठी ते समर्पित व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रातील विविध वैचारिक साहित्याचे संमेलनाचे उदघाटक तथा संमेलन अध्यक्ष म्हणुन त्यांनी हजेरी लावलेली आहे. तसेच सकाळ च्या नाशिक आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी दिर्घकाळ काम पाहिले आहे. तसेच सकाळ माध्यम समुहाचे उत्तर महाराष्ट्र निवासी संपादकपद त्यांनी सांभाळले आहे. त्यांची असंख्य पुस्तके प्रकाशित असुन, मराठी साहित्यात त्यांचे नाव सर्वदूर पोहचलेले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा आयोजित १० व्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी स्विकारण्याठी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. डॉ. आनंद आहिरे यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचे नाशिक उपजिल्हाध्यक्ष माणिकराव गोडसे पाटील, विलास सूर्यवंशी – संपादक-स्टार न्युज, नरेंद्र जोशी ( उपसंपादक-दैनिक देशदूत ) आदींनी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना संमेलनाध्यक्ष म्हणून या संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे अध्यक्षतेखाली १७ ऑक्टोबरला धामोरे, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर येथे हे नियोजित साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे प्रमुख पाहुणे तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे उपस्थित राहणार आहेत.

संमेलन यशस्वीतेसाठी प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. आनंद अहिरे, आयोजक तथा नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अजिंक्य लव्हाट, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव गोडसे पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब गिरी, नाशिक तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, सिन्नर तालुकाध्यक्ष अमोल चिने, महिला कार्यवाहक विद्या पाटील, सुलभा भोसले, डॉ. बागूल आदीसह पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!