धावत्या रेल्वे मधील महिला प्रवाश्यांच्या बॅगा लुटणारी परराज्यातील टोळी इगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडून गजाआड

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख रेल्वे स्थानकावर गाडी उभी असताना जून महिन्यात महिला प्रवाशांच्या पर्समधून ५८ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या परराज्यातील टोळक्याचा लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी यांनी शोध लावला आहे. संबंधित ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांच्या कामगिरीचे सगळीकडे कौतुक होत आहे.

अधिक माहिती अशी की, फिर्यादी संगीता अरुण दुबे वय ४८ वर्षे रा. वार्ड नं ०२ आसरल गर्ल्स हॉस्टेलजवळ रीवा निपानिया मध्यप्रदेश, सहफिर्यादी सिमाकुमारी ललीतेश्वर प्रसाद वय ४१ वर्षे रा. रामकृष्ण मदर टेरेसा पद पटना २७ बिहार हे दिनांक २३ जूनला डावुन ट्रेन पाटलीपुत्र एक्सप्रेसने एलटीटी कुर्ला ते सतना व पटना असा प्रवास करीत होते. रेल्वे स्टेशन पाडळी देशमुख जवळ गाडी थांबलेली असताना कोणीतरी अनोळखी आरोपीने फिर्यादी व सहफिर्यादी यांची डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्समधील ५८ हजार रुपये जबरीने हिसकावुन चोरुन नेली. त्यांनी फिर्याद दिल्यावरुन लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी येथे भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा  दाखल आहे.

गुन्ह्याचा तपास करतांना मिळालेल्या माहितीवरून लोहमार्ग पोलीस ठाणे भरुच, गुजरात येथील दाखल गुन्ह्यात अटक आरोपी दिपक महेंद्रसिंग प्रजापती वय २२ वर्षे व्यवसाय ड्रायव्हर एचडब्ल्युसी गोदामजवळ पंजाबी कॉलनी टोहना, जि. फतेहबाद हरियाणा, सुखविर महेंद्र वाल्मीक वय २१ वर्षे व्यवसाय मजुरी रा. राजनगर बस्ती वार्डनं २ टोहाना हरियाणा, सन्नी उर्फ सोनी पुरण फुल्ला वय ३० वर्षे व्यवसाय – सेक्युरीटी गार्ड रा.  राजनगर बस्ती वार्ड नं २ रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ चंदीगड टोहाना हरियाणा, राहुल चेनाराम धारा/वाल्मीकी वय २६ वर्षे रा. टिळक नगर गोमर हॉस्पीटल जुना बस स्टॅड जवळ टोहाणा जि. फतेहबाद हरियाणा यांना गुन्ह्यात अटक असताना पाडळी देशमुख जवळ पाटलीपुत्र एक्सप्रेस मध्ये रेल्वे स्टेशन दरम्यान चोरी केल्याची कबुली दिली आहे. घटनास्थळाचा डाटा प्राप्त केला असता यातील आरोपी यांनी वापरलेल्या मोबाइलचे ट्रेस झाले आहेत. कोटा रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांना कोटा मध्यवर्ती कारागृह राजस्थान येथे भरती केले. ह्या आरोपींना इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी कोटा राजस्थान येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे. ह्या टोळक्याचा इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!