केपीजी महाविद्यालयाचे प्रा. भागवत महाले यांचा शिक्षकदिनी सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

शिक्षकदिना निमित्त गोरक्षनगर संस्थेतर्फे केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते इगतपुरी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भागवत महाले यांचा ट्रॉफी देवुन सत्कार करण्यात आला. आतापर्यंत त्यांना सामाजिक ग्लोबल इंडिया अँचिव्हर्स  गोल्ड मेडल पुरस्कार २०२०,  पुणे विद्यापीठ आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार २०१३, NPEGL ZP आदर्श केंद्र प्रमुख पुरस्कार २००६, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार २००७ हे पुरस्कार मिळालेले आहेत. नाशिक येथील अभिषेक प्लाझामध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निवृत्त शिक्षक विठ्ठल धनाईत, भालचंद्र सुराणा, प्राचार्य राजेंद्र निकम, प्राचार्य संभाजी सगरे, शिवदास म्हसदे, गोरक्षनगर संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष केटीएचएमचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे महत्व व कार्य विशद केले. यावेळी बहुसंख्य शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. सुत्रसंचालन आणि आभार दीपक अहिरे यांनी केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!