

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
गोंदे दुमाला येथील हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे घटनाकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा समन्वय साधून महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा ह्या उद्धेशाने जयंती उत्सव साजरा झाला. डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वरजय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी “चला संवाद साधु..महाराष्ट्र धर्म वाढवु“ हा कार्यक्रम इगतपुरी तालुक्यात हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातुन राबवला. तालुक्यातील विविध गावांत जाऊन डॉ. आंबेडकरांच्या महत्वपूर्ण पुस्तकांचे वाटप करण्यात आले.


अनसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकासासाठी जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी हिंदवी स्वराज्य ग्रुपने भेटी देऊन संवाद साधला. वंचितांच्या समस्या, अडचणी जाणुन घेऊन त्यावर प्रभावी कार्यक्रम राबवण्यासाठी ग्रुपतर्फे ह्या भेटी देण्यात आल्या. इगतपुरी तालुक्यातील विविध जयंती कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. बाबासाहेबांचे बहुमोल विचार समजून घेऊन प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे. त्यांचा विचारांची सांगड शिवविचारांशी घालून सामाजिक सलोखा आणि एकता राखण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ पुस्तकांचे वाटप इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये करण्यात आले. याप्रसंगी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुपेश हरिश्चंद्र नाठे, शिवव्याख्याते सुनिल भोर, मनसे नेते प्रताप जाखेरे, अजय जाखेरे, माजी सभापती सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, ऋषिकेश प्रदीप मुधळे, संजय कश्यप, अजय कश्यप, सोहम धांडे, संतोष डगळे, अरुण भोर आदी उपस्थित होते.

