कवितांचा मळा : दीपज्योती नमोस्तुते

कवयित्री : सौ. गीतांजली सटाणेकर, पुणे, ७८८७९५६१२७

ज्योत प्रज्वलित होता
एक दिवा धरला हातात
अंधार सरला मनातला
सुख समृद्धी घरात

शुभं करोतीचे मंजुळ स्वर
श्रद्धा भक्तीच्या मंदिरात
दिवा जळो तुळशीपाशी
मांगल्याच्या पवित्र सुरात

वात होऊनी हळवी प्रेमळ
संसारासाठी हसत तेवले
रोज नैवेद्य दाखवून देवाला
सर्व तृप्त होताच सुखावले

हवे असतात मनाला
कौतुकाचे दोन शब्द
जपते नात्यांना आनंदाने
जिव्हाळा करतो निःशब्द

दीपज्योती नमोस्तुते
ईडापीडा टाळो घराची
त्यागाने कष्टाने जपले
दृष्ट काढते घरमंदिराची

कवितांची निवड आणि संकलन साहाय्य : प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!