आमदार हिरामण खोसकर यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी आपल्या मतांचे योगदान द्यावे : माजी सरपंच हभप मनोहर महाराज घोडे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – लोकांसाठी सदैव कार्यरत आणि कोणत्याही क्षणी उपलब्ध असणारे क्रियाशील आमदार म्हणून नाशिक जिल्ह्यात हिरामण खोसकर हे ओळखले जातात. विकासाचे कोणतेही काम घेऊन गेल्यावर हिरामण खोसकर यांच्याकडून त्या कामासाठी नक्कीच साहाय्य मिळाल्याशिवाय राहत नाही. अशी उत्तम पार्श्वभूमी असणारे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत. येत्या काळात इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाला अधिकाधिक विकसित करण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांना विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन घोटी ग्रामपालिकेचे माजी सरपंच हभप मनोहर महाराज घोडे यांनी केले आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक विकासकामे करून सामान्य माणसाला आनंदी करायला झटणारे हिरामण खोसकर हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत. अशा कार्यतत्पर माणूस पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वांनी येत्या २० तारखेला त्यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटण दाबावे. हिरामण खोसकर यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी आपल्या मताचे योगदान द्यावे असेही मनोहर महाराज घोडे यांनी म्हटले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!