इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. चिंचलेखैरे, खैऱ्याची वाडी, आदूरपाडा या अतिशय दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत मंडळाने भेट दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना अतिशय प्रामाणिकपणे थंडी, ऊन, पाऊस याची कसलीही पर्वा न करता शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यात आली. कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी गुणवंत शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी कर्तव्यदक्ष शिक्षकांना शिक्षकदिनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन फेटे बांधुन गौरवण्यात आले.
यावेळी शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना फरसाण, बिस्कीटचे वाटप करण्यात आले. याप्रकारे कळसुबाई मित्र मंडळाने शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे, शिक्षक श्याम आदमाने, नामदेव धादवड, भाग्यश्री जोशी, प्रशांत बांबळे, हौशीराम भगत, योगेश गवारी, शिवाजी फटांगरे, भोरू सावंत या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, उपाध्यक्ष गजानन चव्हाण, सचिव बाळासाहेब आरोटे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, डॉ. महेंद्र आडोळे, सुरेश चव्हाण, गोकुळ चव्हाण, जनार्दन दुभाषे, नितीन भागवत, दीपक कडू, आदेश भगत, ज्ञानेश्वर मांडे, संतोष म्हसणे आदींसह गिर्यारोहक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होते.