वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
बैलगाडा शर्यत सुरू कराव्यात असे निवेदन इगतपुरीचे नायब तहसीलदार दिनेश पाडेकर यांना छावा संघटनेकडून देण्यात आले. येत्या पंधरा दिवसांमध्ये शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी. बैलगाडा शर्यती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पाचशे वर्षांपासूनची परंपरा आहे. शेतकऱ्यांसाठी बैलगाडी शर्यत म्हणजे एक सण आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या सणाला व परंपरेला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणून एक प्रकारे विरोधच केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बैलगाडा शर्यतीप्रेमी व विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. त्यामुळे राज्यभरातून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही शासनाला बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देत आहोत. पंधरा दिवसात राज्य शासनाने शासनाने यावर निर्णय घेऊन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी पेटा संस्थेवर देखील नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, घोटी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा देणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी निवेदन देतांना छावा संघटनेचे अध्यक्ष सुनिल भोर, जिल्हा संघटक जनार्दन गतीर, बैलगाडा प्रेमी केरू चौधरी, महिंद्र गतीर, दिलीप गतीर, बाळू भटाटे, कृष्णा लहाने, सागर गायधनी, संतोष गोईकणे यांसह तालुक्यातील बैलगाडा प्रेमी व चालक-मालक उपस्थित होते.