इगतपुरीनामा न्यूज, दि. 19
घोटीतील भदे मळा आणि दुर्गानगर परिसरात झालेल्या सशस्त्र धाडसी दरोड्यातील एका संशयित आरोपी घोटी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. इगतपुरी न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्य 5 आरोपी लवकरच जेरबंद करण्यात येतील अशी माहिती घोटीचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिली. 48 तासात आरोपीचा शोध लावल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
गुप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील बिडकोन पोलीस ठाण्याच्या अटक करण्यात आली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, घोटी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही कामगिरी केली. संशयित आरोपी कोहिनूर दारासिंग भोसले वय २४ याला पैठणच्या एका हॉटेलवरून ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, हवालदार रवींद्र वानखेडे, मंगेश गोसावी, विक्रम झाल्टे, पंकज दराडे, शिवाजी शिंदे, धर्मराज पारधी यांनी ही कामगिरी केली.