निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
घोटी सिन्नर मार्गावर पिंपळगाव मोर शिवारात आज पहाटे गोमांस वाहतूक करणारी पिक-अप उलटली. भरधाव वेगात उतारावर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला असून चालक पसार झाले आहेत. एम.एच. १४ जी. डी. ४८५२ हा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा क्रमांक आहे. भाजीपाला वाहन भासवण्यासाठी टोमॅटो भरलेले होते. पाठीमागे व वरील बाजूस टोमॅटो जाळ्या भरलेल्या होत्या तसेच मध्ये प्लाय-वुड च्या साहाय्याने गोमांस बंदिस्त केले होते.
गाडीमध्ये संशयास्पद अतिरुक्त नंबर प्लेट
गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा क्रमांक एम.एच. १४ जी. डी. ४८५२ असून गाडीच्या केबिनमध्ये एम. एच. १४ एच. यू. ६६३२ नंबरची अतिरिक्त नंबर प्लेट सापडली आहे. अतिरिक्त संशयास्पद नंबर प्लेट सापडल्याने वाहन क्रमांक बदलवून वाहतूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दररोजच वाहतूक होत असल्याचा संशय
अपघातग्रस्त वाहनावरून असे निदर्शनास येते की टोमॅटोची गाडी भासवुन गोमांस वाहतूक होते होती. त्यावरून दररोजच अशी वाहतूक होत असल्याचा संशय नागरिकांना व्यक्त केला जात आहे. माजी सरपंच धनराज बेंडकोळी यांनी पोलीस पाटील लक्ष्मण काळे यांच्यामार्फत घोटी पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी तातडीने भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास घोटी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस करत आहेत.