पिंपळगाव मोर येथील सरपंच व सदस्यांचे पंचायत राज समितीला निवेदन

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

पिंपळगाव मोर येथील सरपंच व सदस्य यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांना निवेदन दिले आहे. पिंपळगाव मोर ग्रामपंचायत पेसा ग्रामपंचायत असून तत्कालीन ग्रामसेवक संतोष मिठाराम जाधव यांची सततची गैरहजेरी तसेच घरपट्टी व पाणीपट्टी आदी करांचा भरणा बँकेत करत नसल्याची तक्रार वरिष्ठ कार्यालयात केली होती. आदींबाबत समितीला निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तक्रार केल्यानंतर श्री. जाधव यांनी विरोधी गटास हाताशी धरले. जिल्हाधिकारी नाशिक यांना सरपंच व सदस्यांविरुद्ध विवाद अर्ज दाखल करण्यास ग्रामसेवक यांनी सांगून विवाद अर्जात खोटे अहवाल सादर केले आहेत. गटविकास अधिकारी इगतपुरी यांना सदर बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संतोष जाधव यांना निलंबित केले आहे.
सरपंच व सदस्य यांना जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यासाठी कागदपत्रे मिळू नयेत म्हणून एक महिना उलटून गेला तरीही संपूर्ण दप्तराचा कार्यभार न देता ग्रामपंचायतीचे दप्तर जाधव यांनी स्वतःचा घरी नाशिक येथे घेऊन गेले आहेत. कार्यभार देत नसल्याचे गटविकास अधिकारी यांना सांगून देखील आजपावेतो उपलब्ध करून दिलेले नाही. दप्तर उपलब्ध नसल्याने कामकाज होत नसून सदर गोष्ट आदिवासी सरपंच व सदस्य हे अपात्र होण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले आहे.

पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीच्या बाबतीत यापूर्वी २०१८ साली घडलेला असून सर्व सदस्यांकडे शौचालय असून तीन सदस्यांकडे शौचालय नसल्याचा खोटा अहवाल दिल्याने सदर सदस्य अपात्र झाले होते. पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आम्हांला न्याय मिळू नये यासाठी ६ महिन्यापासून मासिक सभा व ग्रामसभा यांचे प्रोसिडिंग तसेच इतर दाखले मागत आहोत. परंतु ग्रामसेवक व विस्तार अधिकारी कागदपत्रे मिळण्यापासून वंचित ठेवत असल्याने कामकाज ठप्प आहे.

आज नाशिक येथे सरपंच व सदस्य यांनी पंचायतराज समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांना निवेदन देऊन आम्हाला दप्तर उपलब्ध करण्याचे आदेश द्यावे. तसेच मुद्दाम छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. निवेदन देतेवेळी सरपंच हिराबाई गातवे, भास्कर मलसाने पाटील, युवराज गातवे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!