प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – मुलींचे शिक्षण सुलभ व्हावे म्हणून शासनाच्या मानव संसाधन उपक्रमांतर्गत मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या. याआधी इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक सायकल गोवर्धने विद्यालयातील विद्यार्थ्यांनाच मिळाल्या आहेत. याबाबत उपस्थितांनी सर्व शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करतांना रस्त्यावरून नियमांचे पालन आणि महामार्गावरील भुयारी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सरपंच हिरामण राव, स्कुल कमिटी चेअरमन गणपत राव, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक राव, उपसरपंच भास्कर राव, पोलीस पाटील शिवाजी आवारी, मुख्याध्यापक भगवान जाधव, शिक्षक सुनील वाणी, विजया पाटील, भारती शिंदे, दगडू तेलोरे, सुनिल वाणी, संजय कांडेकर, उमेश महाजन, रमेश खैरनार, सुरेखा चव्हाण, प्रमिला निर्मळ, विनायक लाड, ओमानंद घारे, रमेश गायकवाड उपस्थित होते.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group