इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव कृषी उद्योग आधारित कार्यक्रम सुरू आहे. त्या अंतर्गत सोनगाव येथे कृषिदूत व कृषिकन्या यांनी शेतकऱ्यांना गेल्या एक ते दीड महिन्यापासून विविध विषयांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांना या संदर्भात इत्यंभूत माहिती दिली. त्यांनी उद्यानविद्या ( Horticulture ) या विषयाशी निगडित असलेले एक प्रात्यक्षिक करून त्या प्रात्यक्षिकाबद्दल सविस्तर माहिती दिली. उद्यानविद्या विषयातील नर्सरी या व्यवसायामध्ये तयार करण्यात येणारे गादी वाफे त्यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले.
कृषिदूत ऋत्विक जाधव, मयूर वाजे, श्रेयस हळदे आणि कृषिकन्या आदिती खालकर आदींकडून जुलै ते सप्टेंबर दरम्यान सोनगाव येथील शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिके दाखवणार आहेत. त्यांनी बीज प्रक्रिया, माती परीक्षण, फवारणीची पद्धत, शीत कक्ष आदी प्रात्यक्षिके आतापर्यंत सादर केलेली आहेत. त्यासोबतच एकात्मिक कीड, तन-खत-पाणी व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, बाजारभाव आदींचे महत्त्व सांगितले. महिलांना दुधापासून पदार्थ तयार करून विक्रीचे मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय वन विभाग खात्याचे अधिकारी ( IFS ) गोरख काळुंगे, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय कारे, समाधान कारे, प्रकाश कारे, अमोल कारे, बाळासाहेब सुकेणकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण, RAWE कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. बी. सातपुते, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रा. डी. एस. शिंदे, प्रा. वाय. डी. भगुरे, प्रा. डॉ. ए. यू. कानडे, प्रा. एस. यू. सूर्यवंशी, प्रा. के. के. सूर्यवंशी, प्रा. सी. एस. देसले यांचे मार्गदर्शन लाभले.