राजयोग प्रतिष्ठानकडून आगळावेगळे रक्षाबंधन : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींसोबत सणाचा उत्साह

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील मुलांसोबत रक्षाबंधन साजरी करण्यात आली. हे प्रतिष्ठान गेल्या ५ वर्षा पासुन आगळे रक्षाबंधन साजरी करत असते. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा महिरावणीचे उपसरपंच रमेश खांडबहाले, डॉ. प्रशांत मुर्तडक माजी सैनिक विजय कातोरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष व राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते, जिल्हा उपाध्यक्ष ललीत मुळाणे, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, वाडीवऱ्हे ग्रामपंचायत सदस्य गोविंद डगळे, मनविसे.तालुकाध्यक्ष दीपक कसबे, वैभव दातीर, ईश्वर गवते आदींसह सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!