त्र्यंबक जाधव, इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे ( महाराष्ट्र व गोवा प्रदेश ) तसेच क्षेत्रीय प्रचार अधिकारी नासिक यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव संपन्न होत आहे. त्या निमित्ताने क्रांतिकारकांचे स्मरण करण्यात येणार आहे.स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून देशप्रेम व क्रांतिकारकांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी देशभक्तीपर, समाज प्रबोधनाचा कार्यक्रम गीतांचा कार्यक्रम २३ ते २९ ऑगस्ट या कालावधीत “अमृतमहोत्सवी सप्ताह ” सादर होणार आहे. भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, मान्यताप्राप्त आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे, नाशिक यांच्या कलाभूषण शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी कलापथकाद्वारे हा जनजागृती व समाजप्रबोधनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पंचायत समिती, सर्वतीर्थ टाकेद, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक भगूर, खुटवड नगर, औद्योगिक वसाहत गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे व हुतात्मा स्मारक नाशिक या ७ ठिकाणी २३ ते २९ ऑगस्ट पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. जितेंद्र पानपाटील व्यवस्थापक, प्रादेशिक लोकसंपर्क पुणे, पराग मांदळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी नाशिक, सदाशिव मलखेडकर, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाभूषण शाहीर उत्तम गायकर, शंकरराव दाभाडे, शिवाजी गायकर, देविदास साळवे, नामदेव गणाचार्य, प्रशांत भिसे, दुर्गेश गायकर, पंढरीनाथ भिसे, रामकृष्ण मांडे हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. कोविडचे सर्व नियम पाळून स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, देशवासियांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भारत सरकार, सुचना व प्रसारण मंत्रालय, नाशिकचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी केले आहे.