इगतपुरीनामा न्यूज – नांदूरवैद्य येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका वैशाली अहिरे यांची होणारी बदली थांबवण्यात यावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख तथा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संदीप पवार आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे. ह्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग असून एकूण ८६ विद्यार्थी शिक्षण घेतात. या वर्गांसाठी मुख्याध्यापक व दोन शिक्षक असे तीन जण कार्यरत आहेत. त्यातील शिक्षिका वैशाली अहिरे यांची बदली झाल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल. यासह पाच वर्गांसाठी दोनच शिक्षक काम पाहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. मुख्याध्यापकांना इतर कामांचा बोजा घेऊन काम करावे लागत असल्याने उर्वरित एकच शिक्षकाला पाच वर्गांची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. ह्या शिक्षिकेची बदली करू नये अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर मुसळे, विनायक रोकडे, माजी सरपंच दिलीप मुसळे, रवी काजळे, सुभाष मुसळे, एकनाथ कचरे, अंकुश पवार, राणू मुसळे, दीपक मुसळे, राजू यंदे, संतोष भागवत, ज्ञानेश्वर मुसळे, रोहिदास सायखेडे, नामदेव यंदे यांच्यासह महिलांनी दिला आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group