इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब गावातील जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिर या ठिकाणी वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, राज्यातील सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीकर, बॉलिवूड अभिनेते कांचन पगारे, डायरेक्टर प्रोड्युसर संजय अण्णा झनकर, अभिनेते किरण भालेराव, हिंदी मधील उत्कृष्ट अभिनेत्री श्रावणी गोस्वामी आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
चिन्मय दादा युवा मंचचे अध्यक्ष बंटी भाऊ पगारे यांनी आलेल्या सर्व बॉलीवुड व मराठी कलाकारांचे सर्व गावकरी बांधवांच्या वतीने स्वागत केले. कार्यक्रमाप्रसंगी माणिकखांबचे सरपंच श्याम चव्हाण, पोलीस पाटील उत्तम शिवराम पगारे, मनसे नेते भोलेनाथ चव्हाण, भारत भटाटे, सह कलाकार दशरथ शिंदे, पत्रकार विजयकुमार कर्डक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.