परदेशवाडी भागात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील परदेशवाडी भागात एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजले नसले तरी घोटी पोलिसांकडून याबाबत कसून तपास केला जाणार आहे. गोपीचंद मालोदे वय 25 ते 27 रा. छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पिंपळगाव मोर ते भंडारदरा रस्त्याचे काम करणाऱ्या एका प्लांटवर हा युवक काम करीत होता असे समजते. क्रेन ऑपरेटर म्हणून तो काम करीत होता. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून याबाबत खेड परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!