इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधितांवर प्राथमिक अवस्थेतील उपचार करण्यात येतात. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असलेले बेड आहेत. मात्र वाढता कोरोनाचा संसर्ग रुग्णांच्या मुळावर उठल्याने ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा संकटकाळात “तैनवाला” फाउंडेशन मदतीला सरसावले आहे. फाउंडेशनतर्फे कोरपगाव कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम सुरू झाले असून दिवसात येथे बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड कार्यान्वित होणार आहेत. शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनानुसार तैनवाला फाउंडेशनच्या खर्चातून हे काम होत असल्याने नागरिकांनी श्री. बोडके यांचे आभार मानले.
तैनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी यापूर्वीच इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि कोरपगाव कोविड सेंटर येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक साहित्याचे वितरण केले आहे. कोरोनामुळे इगतपुरी तालुक्यातील वैद्यकीय सेवांवर कमालीचा ताण आला आलेले आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन असणारे बेड मिळत नाहीत. परिणामी नागरिक व्यथित झाले आहेत. ह्यावर उपाय म्हणून गोरख बोडके यांनी तैनवाला फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांसाठी बेडजवळ ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केलेले आहे. येत्या २ दिवसाच्या आत हे काम पूर्ण होऊन रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड कार्यान्वित होत आहेत. नागरिकांनी तैनवाला फाउंडेशन आणि गोरख बोडके यांचे आभार मानले आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group