साप्ते त्र्यंबकेश्वर येथील गणपत जाधव सकाळी राष्ट्रवादीत  आणि रात्री काँग्रेसमध्ये दाखल

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज दि. १०

साप्ते येथील माजी सरपंच गणपत जाधव यांनी आजच दोन पक्षात प्रवेश करून पक्ष बदलण्याचा त्रिकोण साधला आहे.  गत पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून लढणारे गणपत जाधव यांनी राष्ट्रवादी –  भाजपा  प्रवास केला आहे. त्याचे पुन्हा आज सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश करून तालुका उपाध्यक्ष पद मिळवले. मात्र आज रात्रीच इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

पंचायत समिती  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या पाच तासातच आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली  सायंकाळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जाधव हे आधीपासूनच काँग्रेसमध्येच होते. ते फक्त आपल्यापासून काही काळ दूर गेले होते. पण आता ते परत आले आहे. ते कुठलीही जबाबदारी पेलू शकतात. यांना योग्य जबाबदारी दिली जाईल असे   आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले. ‘काँग्रेसमध्ये  आणखी काही जणांचा प्रवेश होणार आहे. काही चांगल्या लोकांना पक्षात घेणार असून योग्य ती जबाबदारी देण्यात येणार असल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गणपत जाधव  यांनी पक्ष बदलण्यात आता त्रिकोण साधला असून तीन पक्ष बदलले आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीत निवडणुकीमध्ये जाधव यांचा फायदा होईल. गत निवडणुकीत भाजपकडून त्यांनी लढत चांगली लढत देत थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!