नाशिक बाजार समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी : त्र्यंबकेश्वरला पिंगळे गटाकडून ‘आपला पॅनल’ची घोषणा : त्र्यंबकेश्वर-हरसूलकरांनी बिरसा मुंडा यांची मूर्ती देऊन पिंगळेंना दिला शब्द

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जाहीर झाली असली तरी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन हरसुल व खंबाळे येथून सुरुवात झाली आहे. समविचारी सभा घेऊन निवडणूक तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी पिंगळे गटाने हरसूल येथे बुधवारी आपला पॅनल’ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. समविचारी सभेवेळी सभापती देविदास पिंगळे उपस्थितांशी संवाद साधतांना म्हणाले की, सहकार क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव, नियोजनाच्या जोरावर आपल्या कार्यकाळात एनडीसीसी बँकेची ६०० कोटीची ठेव रक्कम ३ हजार ३०० कोटीपर्यंत नेली. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून  सुलभ पद्धतीने कर्ज वितरण केले. नासाका सभापती असताना दोन वेळा कारखाना नफ्यात आणला. नाशिक बाजार समितीचे कामकाज करत असताना विविध विकासकामे केली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाशिकरोड, त्र्यंबक, हरसुल उपबाजार सुरू केला. नाशिक बाजार समितीचे उत्पन्न आणि मालमत्ताही वाढवली.

नाशिक बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. सहविचार सभेस उपस्थितांची गर्दी व पेठ हरसूल सदस्य व सभासदांनी दाखविलेला विश्वास व आपला पॅनलला दिलेला एकमुखी पाठिंबा यामुळे पुढील काळात सदैव शेतकरी हिताची कामे करीन.
- देविदास पिंगळे, माजी खासदार तथा नाशिक बाजार समिती सभापती

ते पुढे म्हणाले की, मागील सत्ता काळात बाजार समितीचे घटलेले उत्पन्न पुन्हा वाढवले. त्र्यंबक उपबाजार आवाराचा विकास साधत मोठ्या वास्तूचे काम सुरू असल्याचे सांगत त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. हरसूल व खंबाळे भागातील सभासद मोठ्या संख्येने हजर असलेल्या या सभेस आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार तथा नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, संचालक संपतराव सकाळे, बहिरू पाटील मुळाणे, पुंडलिक साबळे, विनायक माळेकर, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये, संजय तुंगार, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, समाधान बोडके, विष्णुपंत म्हैसधुणे, अरुण मेढे, पांडु झोले, मनोहर मेढे, निवृत्ती लांबे, मोहन बोडके, भास्कर मेढे, शरद मेढे, संजय मेढे, भावडु बोडके आदी उपस्थित होते.

यावेळी त्र्यंबकेश्वर हरसूलकरांनी सभापती देवीदास पिंगळे यांना बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देत या भागातील जनाधार हा पिंगळे गटाच्याच पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा शब्द दिला आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर, संचालक संपतराव सकाळे आदी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वच जण पिंगळे गटाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा संकल्प केला. बाजारसमितीच्या प्रत्येक निवडणुकीसाठी सत्ताधारी पिंगळे गटाने त्र्यंबकेश्वर, हरसूल येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद व ग्रामपंचायत सदस्यांची सहविचार सभा घेत आघाडी घेतली आहे. हरसूल येथे उपबाजार आवारासाठी जागा घेऊन आंबा व भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी भव्य दिव्य अशी मार्केटची वास्तू उभारण्याची मागणी आहे. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून आगामी काळात ही मागणी पूर्ण होईल. यामुळे नाशिक जिल्ह्यातील गावठी आंबा हा गुजरात, मुंबईसह राज्यात जाईल, असा विश्वास देविदास पिंगळे यांनी व्यक्त केला.

नाशिक बाजार समितीचा विकास साधणाऱ्या देविदास पिंगळे गटाच्या सोबत मी काम करणार असून आज पावेतो पिंगळे गटाने केलेली विकासकामे मी डोळ्याने पाहत आहे. शेतकऱ्याच्या कामासाठी निम्म्या रात्री जरी पिंगळे यांना संपर्क साधला तरी काम मार्गी लागते. पिंगळे यांची काम करण्याची पद्धत, सहकार क्षेत्राचा असलेला दांडगा अनुभव भविष्यात आपल्या सर्व पेठ हरसूलच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगला आहे.
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर

यावेळी मनोहर महाले, भिका पाटील महाले, मनोहर चौधरी, भास्करराव गावित, नामदेव हलकांदर, समाधान बोडके, मुख्तार सैय्यद, देविदास जाधव, मिथुन राऊत, दामोधर राऊत, रामदास वाघेरे, अरुण कासिद, हरिभाऊ बोडके, बाळासाहेब म्हस्के, विलास कड, विलास कांडेकर, दिलीप थेटे, नामदेव गायकर, अर्जुन मौले, मधुकर पाखणे, मंगळू निंबारे, गोकुळ बत्तासे, पेठ विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन व्हॉइस चेअरमन व संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकेश्वर, पेठ, हरसूल येथील सदस्य व सभासदांनी एकमताने आम्ही आपला पॅनलच्या पाठीशी खंबीरपणें उभे असून इतर कुणालाही आमच्याकडे थारा नाही, असे सांगितले. बहिरू मुळाणे यांनी सूत्रसंचालन तर समाधान बोडके यांनी आभार मानले.

देविदास पिंगळे यांच्या पॅनलमध्ये काम करण्याची यापूर्वीदेखील मला इच्छा असूनही मला काही लोक येऊ देत नव्हते. आता मात्र पिंगळे यांच्यासारखा संयमी आणि विकास साधणाऱ्या नेत्यासोबत काम करणार आहे. नाशिक बाजार समितीत दादागिरी चालत नाही, विकास साधणाऱ्या पिंगळे गटाच्या पॅनलच्या पाठीशी आपण उभे रहाल हा मला विश्वास आहे.
- संपतराव सकाळे, संचालक तथा माजी सभापती

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!