घोटीच्या श्रीराम मित्र मंडळाकडून पर्यावरण वाचवण्याची नवरात्रोत्सवात जनजागृती

शशिकांत तोकडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

घोटी येथील तुकारामनगरच्या श्रीराम मित्र मंडळाने यावर्षी नवरात्रीमध्ये “पर्यावरण वाचवा” हा संदेश देणारा निसर्गाचा देखावा साकारला आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘झाडे हीच संपत्ती’ अशा प्रकारच्या उपयुक्त सूचनांचे फलक लावून जनजागृती करीत आहे. यासह कोरोना महामारी आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबद्दल लोकांमध्ये असलेल्या शंका दुर करण्यात येत आहे.  ‘झाडे लावूया कोरोनाला हरवूया’ असा संदेश लोकांमध्ये चांगला प्रसारित झाला आहे. दरवर्षी हे मंडळ गणपती उत्सव, नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमा मॊठ्या उत्साहात साजरा करतात. मागील वर्षी मंडळाने प्रशासनाला सहकार्य करत सर्व उत्सव रद्द केले. मात्र यावर्षी येथे कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. अध्यक्ष तानाजी डावखर, मोहन डावखर, कैलास लंगडे, पोपट गिते, शशिकांत तोकडे, सागर गांगुर्डे, विशाल डावखर, रोहित डावखर, आनंद दगडे, निलेश गहिले आदींसह मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!