१०१ रोपांची लागवड करून खेडचे लक्ष्मण परदेशी यांचा वाढदिवसाला स्तुत्य उपक्रम

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

समाजात वेगळा ठसा उमटवण्यासाठी आजची पिढी वेगवेगळे प्रयत्न करत असते. वाढदिवशी पार्टी- धांगडधिंगा देखील आपल्याला राजरोसपणे पाहायला मिळतोय. पण आपल्या वाढदिवशी वृक्षारोपण करून आगळावेगळा उपक्रम आणि अनावश्यक खर्च सत्कारणी लावण्याचे काम खेड येथील लक्ष्मण परदेशी यांनी केले.

खेड भैरव ता. इगतपुरी येथील परदेशवाडीचे रहिवासी लक्ष्मण परदेशी यांनी त्यांच्या ४६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शेतात १०१ वृक्षाच्या रोपांची लागवड करून समाजात एक आगळा वेगळा संदेश दिला आहे. लक्ष्मण परदेशी यांचा रविवारी ४६ वा वाढदिवस होता. मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च करण्यापेक्षा उच्च प्रतीच्या १०१ वृक्षांच्या रोपांची बार्शी जि.सोलापूर येथून फळ झाडांच्या रोपांची खरेदी करण्यात आली. यामध्ये आंबा, पेरू, सिताफळ या फळ झाडांच्या रोपांचा समावेश आहे. ह्याकामी त्यांना हिरामण पारधी, भोरु मधे यांचे सहकार्य लाभले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच पंचक्रोशीतून श्री. परदेशी यांच्या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे.

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून एकशे एक फळझाडांची शेताच्या बांधावर लागवड केली. तसेच लागवड केलेल्या सर्व रोपांची व्यवस्थित काळजी घेऊन सर्व रोपे जगविण्याचा संकल्प केला आहे.
लक्ष्मण परदेशी, खेड भैरव ता. इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!