नवीन कसारा घाटात ट्रक १०० फूट कोसळून अपघात : अपघातग्रस्त नाशिकरोडचे: १ ठार ३ गंभीर जखमी

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

मुंबई-आग्रा महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा ट्रक आज पहाटे 4  वाजता 100 फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच  आपत्ती व्यवस्थापन टीमने भरपावसात घटनास्थळी धाव घेतली. पहाटे 4 ते 7 पर्यंतच्या अथक प्रयत्नाने गंभीर जखमी असलेल्या 3 जणांना सुखरूप बाहेर काढले तर 1 जण जागीच ठार झाला.

MH 12 HD 8355 हा ट्रकचा वाहन क्रमांक आहे. ह्या अपघातात वाहनचालक गोकुळ शिवाजी बोडके वय 31 रा. नासिकरोड हे जागीच ठार झाले. अमित चंद्रकांत कुलकर्णी वय 35, योगेश संजय पाडळे वय 35, रा. नाशिकरोड, शिवा वय 40 रा. एकलहरे हे तिघे गंभीर झाले आहेत.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, मनोज मोरे, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, विनोद आयरे, लक्ष्मण वाघ, देवा वाघ, जस्सी, बाळू मांगे, पिक ईन्फ्राचे प्रकल्पाधिकारी राकेश ठाकुर, सुरक्षा अधिकारी सनोजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मावरीया, सुरज आव्हाड, किशोर भडांगे, राजेंद्र मोरे, समाधान चौधरी, समाधान चौधरी, नितीन चालसे, राजेंद्र मोरे, भाऊ पासलकर, दीपक मावरिया, अनिल ठाकूर, सूरज आव्हाड, किशोर भडांगे, प्रमोद भटाटे, श्रीपत काळे, राजाराम गायकवाड, मनोज गांगुर्डे, देविदास म्हसणे यांनी 3 तास अथक प्रयत्न केल्याने 3 गंभीर जखमींना वाचवण्यात यश आले. कसारा पोलीस व घोटी टॅप पोलीस घटनास्थळी मदतीसाठी होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!