टाकेद जिल्हा परिषद गटात लोकोपयोगी कामांसाठी सदैव कटिबद्ध : खंडेराव झनकर

खंडेराव झनकर यांच्याकडून भरवीर बुद्रुकला पाणी शुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

आरोग्यदायी विद्यार्थी उद्याचे भविष्य असून गुणवंत विद्यार्थ्यांची सक्षम फौज निर्मित होणे अत्यावश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित ठेवणे अत्यावश्यक आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणारे शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना आजारांपासून लांब ठेवू शकते. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करतांना आत्मिक समाधान मिळाले आहे असे प्रतिपादन राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव शिवराम झनकर यांनी केले. येणाऱ्या काळात ह्या भागात लोकोपयोगी उपक्रमांनी नागरिकांसाठी काम करण्यासाठी शपथबद्ध असल्याचे ते म्हणाले. भरवीर बुद्रुकचे सरपंच अरुण घोरपडे यांनी खंडेराव झनकर यांची ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसंपर्क अभियानांतर्गत खेड जिल्हा परिषद गटातील टाकेद गणामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी भरविर बुद्रुक येथील दिमाखदार कार्यक्रमात खंडेराव झनकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, टाकेद जिल्हा परिषद गटात शिवसैनिक आणि नागरिकांच्या आशीर्वादाने आगामी काळात सामाजिक कामांचा इतिहास उभा करण्यासाठी माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. त्यामुळेच मला काम करण्यास मोठी प्रेरणा मिळत आहे.

भरवीर बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निरोगी आरोग्यासाठी शिक्षकांकडून पाणी शुद्धीकरण प्रकल्प अर्थात फिल्टर प्लांटची आवश्यकता असल्याचे समजले. त्यानुसार शिवसेना गटप्रमुख साहेबराव झनकर यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव शिवराम झनकर यांनी स्वखर्चाने पाणी शुद्धीकरण प्रकल्प लोकार्पण केला. माजी पंचायत समिती सदस्य स्व. सत्यभामा एकनाथ झनकर यांच्या स्मरणार्थ हा प्रकल्प लोकार्पित करण्यात आला.

लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे खेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, शिवसेना गटप्रमुख साहेबराव झनकर, युवासेना उपतालुकाप्रमुख हेमंत झनकर, गणप्रमुख भीमराव साबळे, खेड गणप्रमुख शिवाजी काळे, सरपंच अरुण घोरपडे, उपसरपंच साहेबराव मदगे, साहेबराव बांबळे, निनावीचे सरपंच गणेश टोचे, शिवसेना शाखाप्रमुख राधाकिसन झनकर, रामदास वाकचौरे, संतोष झनकर, तुकाराम झनकर, प्रवीण वाणी, ज्ञानेश्वर झनकर आदींसह शिवसैनिक, शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नसेवा हीच ईश्वरसेवा असल्याची शिकवण शिवसेना गटप्रमुख साहेबराव झनकर आणि शिवसैनिकांकडून मला नेहमीच मिळत आली आहे. समाजाच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेकडून मला दिशा मिळालेली आहे. त्यानुसार जनतेतील परमेश्वराची सेवा करण्याचे माझे व्रत आहे. येणाऱ्या काळात टाकेद गटातील नागरिकांसाठी झपाटून कामे करण्याचा माझा संकल्प आहे.

- खंडेराव शिवराम झनकर, संस्थापक राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!