
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
कवी प्रमोद अहिरे यांच्या ‘अस्वस्थाच्या कॅनव्हासवर’ या ई-बुक कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते नारायणगाव येथे पार पडले. पुस्तक मार्केट डॉट कॉम नारायणगाव यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सामाजिक विषयावरील ४४ कवितांचा समावेश या कवितासंग्रहात असून दिनानाथ मनोहर, अमोल बागुल, शंकर बोऱ्हाडे, सचिन गरुड आदी साहित्यिकांचे समिक्षापर लेख कवितासंग्रहात समाविष्ट आहेत. दैनिक लोकमत, पुण्यनगरी, सकाळ, गांवकरी आदी वृत्तपत्रांबरोबरच डी. बी. जगत्पुरिया, मोहिनी पेठेकर, डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ.अशोक इंगळे या साहित्यिकांच्याही कवितेवरील प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
यु ट्यूब वरून प्रमोद अहिरे यांचे साहित्य पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/oCmFBf5PnJA
प्रमोद अहिरे यांनी सांगितले की ‘डिजिटल माध्यमामुळे वाचकांचा कल ई-बुक कडे वळाला असल्याने ‘अस्वस्थाच्या कॅनव्हासवर’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात आणले आहे. डिजिटल साक्षरता वाढीस लागल्यामुळे कवितानुरूप विशिष्ट शैलीतील चित्रे पाहण्यासाठी युट्युबवरची लिंक वाचकांसाठी दिलेली आहे.’ या कवितासंग्रहाबद्दल कवी प्रमोद अहिरे यांचे साहित्यिक वर्तुळातून अभिनंदन होत आहे.